नमस्कार,
एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता बदलत चालली आहे. विस्तारत चालली आहे. सोशल मिडीयाच्या प्रसाराने पारंपारिक पत्रकारितेत बदल होत आहेत. आतापर्यंत अबोल राहिलेल्या या नागरिकांच्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण सुरू करायची आहे. ग्रामीण तसेच शहराचा नागरिक स्वत:हून एक जागरूक पत्रकार म्हणून काम करणार आहे. त्याला या व्यासपीठाच्या माध्यमातून स्थान देण्यात येणार आहे. खासकरून तरुण युवक,पत्रकारितेचा क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा आम्हाला अधिक सहभाग आवश्यक वाटतो, तर ज्येष्ठांनी आमची मार्गदर्शनाची गरज पूर्ण करावी.
चला तर, जनता एक्स्प्रेस मराठी न्यूज सोबत विचाराची, विकासाची एक नवीन प्रक्रिया सुरू करू या...
आपल्या सोबतीने.. आपल्या बरोबर....आपल्या खांद्याला खांदा लावून !
मुख्य संपादक : जनता एक्स्प्रेस मराठी न्यूज
संपर्क : 9284041899