छोट्या दोस्तांसाठी मराठी कविता, गोष्टी, गाणी आणि बरंच काही!! :)

नमस्कार,

‘ये रे ये रे पावसा’ आठवतंय? ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ किंवा ‘खबडक खबडक घोडोबा’ ही गाणी आठवतायेत? ह्या प्रश्नांची उत्तर नक्कीच हो असेल, बरोबर? लहानपणी ऐकलेली ही आणि अशी कित्येक बालगीतं आजही आपल्या मनात घर करुन बसली आहेत. हीच तर गंमत आहे बालगीतांची!

साध्यासोप्या शब्दांमध्ये गुंफलेली ह्या बडबडगाणी म्हणजे मातृभाषेसोबत झालेली पहिली वहिली भेट असंच म्हणावं लागेल, हो ना? ह्या बालसाहित्याद्वारे लिहायला वाचायला येण्याआधीच रंग, आकडे, प्राणीपक्षी, चांगल्या सवयी, पाऊस, झाड ह्यांची सहज ओळख होऊन जाते. मुलांचा शब्दसंग्रह आणि चौकसबुद्धी वाढू लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला पंखच फुटतात.

मराठी ह्या आपल्या मातृभाषेतील बालसाहित्य गोड चित्रांतून सादर करण्याचा हेतूने ‘चिऊकाऊ’ची सुरुवात झाली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तसेच मुलांच्या डोळ्यांना सुखकर अश्या रंगसंगतीतून, योग्य गतीतून सादर केलेली ही अर्थपूर्ण अशी जुनी-नवी बालगीत आणि गोष्टी छोट्या दोस्तांना नक्की आवडतील अशी आशा वाटते!

सप्रेम,
चिऊकाऊ